भारतात साजरया केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात. असे म्हटले जाते कि “दिवाळी” रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.
आपल्या देशात दिवाळी हिंदू महिना आश्विन च्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये मोठ्या उल्हासात साजरा करतो. आजकाल दिवाळी मोठ्या रंगीत माध्यमांनी साजरी होते. परंतु दिवाळीचे ऐतिहासिक महत्वास लोक आजही जाणतात.
दरवर्षी दिवाळी अंधारया रात्रीत जगमगत्या दिव्यांनी व आकाश कंदील आणि फटाक्यांच्या रोषनाई नी याच्या दिव्यतेचा अंदाज येतो. दिवाळीत संपूर्ण घराला सजवले जाते. घरी बनविलेल्या मिठायांचे आदान प्रदान केले जाते. भारतात सर्व लोक घराला उजेडाने भरून टाकतात.
बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा या नावाने ओळखला जाणारा हा दिवस दिवाळीतील अत्यंत महत्वाचा असा दिवस आहेत. हिंदू धर्मानुसार मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहुर्तांपैकी हा एक पूर्ण मुहुर्त आहे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर येणाऱ्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला ‘बलिप्रतिपदा’ असे म्हणतात. सोने खरेदी आणि व्यापारांसाठी नव्या वर्षाची ही सुरुवात असते. या दिवशी पतीलाही औक्षण करण्याची पद्धत आहे. दिवाळी पाडवा हा दिवस खास नवरा बायकोचा असतो. त्यामुळे या दिवशी दिवाळी पाडवा शुभेच्छा.
असा साजरा केला जातो दिवाळी पाडवा किंवा बलिप्रतिपदा
- दानशूर राजा बळी याची प्रतिमा काढत त्याची पूजा करण्याची पद्धत आहे. त्याची पूजा करत बळीचे राज्य येवो अशी कामना केली जाते.
- व्यापारांसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. आर्थिक वर्षाची सुरुवात मानत या दिवशी नव्या चोपड्या आणि वह्यांचे पूजन केले जाते.
- तर नव- दांम्पत्यासाठी हा दिवस फारच महत्वाचा असतो. या दिवशी पत्नी पतीला उटण लावून आंघोळ घालते. पती तिला भेटवस्तू देतो. या दिवसाला दिवाळसण असेही म्हणतात. पहिली दिवाळी ही त्यामुळेच नव दाम्पत्यासाठी खास असते.
दिवाळी पाडवा म्हटलं की रोषणाई, प्रकाश आणि दिव्याच्या सणाचा एक वेगळाच उत्साह आपल्याला दिसून येतो. नवरा बायकोच्या नात्याचा हा खास दिवस. दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
1. साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे! उत्तम दिनाचे महात्म्य आहे! सुखद ठरो हा छान पाडवा, त्यात असूदे अवीट गोडवा!
2. आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा!
दिवाळीचा पाडवा हा प्रत्येक नवरा बायकोसाठी खास असतो. या दिवशी बायको नवऱ्याला ओवाळून त्याच्या भावी आयुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवशी अजूनही खास दिवस म्हणजे नवऱ्याकडून बायकोला मिळणारी ओवाळणी. ही तर असते अगदीच खास. अशा आपल्या नवऱ्यासाठी दिवाळी पाडवा शुभेच्छा
1. तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या नात्यासाठी पाडवा हा खास
2. तुम्ही माझ्यासाठी जगातील सुंदर गिफ्ट आहात
या शुभदिनी तुम्हाला उत्तम आरोग्य, आयुष्य लाभो हीच सदिच्छा! – दिवाळी पाडवा शुभेच्छा!
3. तुम्हाला सुख, ऐश्वर्य, उदंड आयुष्य लाभो हीच मनी इच्छा – दिवाळी पाडवा शुभेच्छा!
3. आज बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा. राहो सदा नात्यात गोडवा.
4. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!
5. दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे, सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे…दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
6. दिवाळी पाडव्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
7. उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन आली आज दिवाळी
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वहिवाट – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
8. सगळा आनंद, सगळे सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता, सगळे ऐश्वर्य आपणास लाभू दे – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
9. नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळीची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे…दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
10. दिपावली पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा
सत्याचा असत्यावरील विजय नेहमीच प्रेरणादायी ठरावा – दिवाळी पाडवा शुभेच्छा