Happy Diwali शुभ दीपावली, सर्वाना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

Categories:

भारतात साजरया केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात. असे म्हटले जाते कि “दिवाळी” रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.

आपल्या देशात दिवाळी हिंदू महिना आश्विन च्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये मोठ्या उल्हासात साजरा करतो. आजकाल दिवाळी मोठ्या रंगीत माध्यमांनी साजरी होते. परंतु दिवाळीचे ऐतिहासिक महत्वास लोक आजही जाणतात.

दरवर्षी दिवाळी अंधारया रात्रीत जगमगत्या दिव्यांनी व आकाश कंदील आणि फटाक्यांच्या रोषनाई नी याच्या दिव्यतेचा अंदाज येतो. दिवाळीत संपूर्ण घराला सजवले जाते. घरी बनविलेल्या मिठायांचे आदान प्रदान केले जाते. भारतात सर्व लोक घराला उजेडाने भरून टाकतात.

लक्ष्मीपूजन  = १२ नोहेंबर २०२३

दिवाळीत लक्ष्मी पूजनाला विशेष महत्व आहे. व्यापारीवर्ग तर हा दिवस अगदी मोठ्या उत्साहात साजरा करतो. लक्ष्मीचा वास आपल्याकडे कायम राहावा. घरी असलेला पैसा-अडका टिकवून राहावा यासाठी हा दिवस मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करण्याची पद्धत आहे. लक्ष्मीपूजन नेमके का केले जाते आणि ते कसे करावे हे आता  दिवाळीची माहिती मराठीतून जाणून घेऊया.

लक्ष्मी पूजनाविषयी धार्मिक श्रद्धा: शरद पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या समुद्रमंथनातून लक्ष्मीची उत्पत्ती झाली. शरद पौर्णिमा म्हणजे नवरात्राैत्सवानंतर येणारा कोजागिरीचा दिवस हा लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर दिवाळी हा सण कार्तिक अमावस्येला येतो. कार्तिक अमावस्येचा हा दिवस काली मातेचा असतो. या दिवशी काली मातेची पूजा होणे अपेक्षित असते. असे म्हणतात की, शरद पौर्णिमेचा म्हणेज धवल (प्रकाशाचा दिवस) लक्ष्मीचा आणि अमावस्येचा दिवस हा कालीमातेचा असतो. पण बदलत्या काळानुसार दिवाळीच्या दिवसात लक्ष्मीची पूजाच केली जाते. आता तर दिवाळीत लक्ष्मीपूजनाची प्रथाच रुढ झालेली दिसते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *