भारतात साजरया केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात. असे म्हटले जाते कि “दिवाळी” रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.
आपल्या देशात दिवाळी हिंदू महिना आश्विन च्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये मोठ्या उल्हासात साजरा करतो. आजकाल दिवाळी मोठ्या रंगीत माध्यमांनी साजरी होते. परंतु दिवाळीचे ऐतिहासिक महत्वास लोक आजही जाणतात.
दरवर्षी दिवाळी अंधारया रात्रीत जगमगत्या दिव्यांनी व आकाश कंदील आणि फटाक्यांच्या रोषनाई नी याच्या दिव्यतेचा अंदाज येतो. दिवाळीत संपूर्ण घराला सजवले जाते. घरी बनविलेल्या मिठायांचे आदान प्रदान केले जाते. भारतात सर्व लोक घराला उजेडाने भरून टाकतात.
भाऊबीज १५ नोहेंबर २०२३
बहीण भावाच्या नात्याचे बंध जोपासणारा हा सण म्हणजे ‘भाऊबीज’ दिवाळीची सांगता या दिवसाने होते. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे भाऊबीज अशी या सणाची ओळख आहे. या दिवसाच्या अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. शिवाय या दिवसबाबत अनेक श्रद्धाही आहेत. असे म्हणतात की, या दिवशी स्त्रियांमध्ये देवीतत्व जागृत होतं. या दिवशी बहिणीच्या सानिध्यात राहिल्यामुळे आणि तिच्या हातचे पदार्थ खाल्ल्यामुळे भावाला चांगलाच लाभ होतो. तसंच भाऊबीज स्टेटस ही आवर्जून ठेवलं जातं.
अशी साजरी केली जाते भाऊबीज:
- बहीण- भावाचा सण असल्यामुळे बहिणीने या दिवशी भावाच्या आवडीचे खास पदार्थ बनवावेत. या दिवशी भाऊ हा बहिणीकडे येतो.
- बहिणीने भावाला ओवाळावे आणि भावाने ओवाळणी म्हणून बहिणीला भेटवस्तू द्यावी.
- भावाच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी अपमृत्यू निवारणार्थ यमाला दीप दान करण्याची पद्धत आहे.