Happy Republic Day गणराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Republic Day
Categories:

Republic Day Of India : यंदा भारत देश आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. २६ जानेवारी हा प्रत्येक भारतीयासाठी खूप खास आणि महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस लोकशाही पद्धतीने आपले सरकार निवडण्याची भारतीय नागरिकांची शक्ती प्रतिबिंबित करतो. भारताच्या इतिहासात हा दिवस अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. त्यामुळेच हा दिवस देशभरात आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. या राष्ट्रीय सणाचे वेगळे वैशिष्ट्य आहे, त्यामुळे लोक मोठ्या थाटामाटात हा सण साजरा करतात. पण, तुम्हाला माहित आहे का भारतात प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीलाच का साजरा केला जातो. हा प्रश्न तुमच्याही मनात निर्माण होत असेल, तर आज आम्ही तुम्हाला प्रजासत्ताक दिनाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व सांगणार आहोत.

खरे पाहता, प्रजासत्ताक दिन दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण देशात संविधान लागू करण्यात आले. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. त्यामुळेच या खास दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. सन १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची राज्यघटना लोकशाही बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्याचे काम सुरू झाले. २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांत तयार झालेले भारताचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाच्या संविधान सभेने स्वीकारले. त्यानंतर पुढच्याच वर्षी २६ जानेवारी १९५० रोजी संपूर्ण देशात ही राज्यघटना लागू झाली.

हे आहे २६ जानेवारीचे महत्त्व :

२६ नोव्हेंबरला स्वीकारलेली भारतीय राज्यघटना लागू करण्यासाठी २६ जानेवारी हीच तारीख का निवडली गेली? हा प्रश्न जवळपास प्रत्येक भारतीयाच्या मनात येत असेल. संविधानाच्या अंमलबजावणीसाठी ही तारीख निवडण्यामागे एक विशेष हेतू होता. खरे तर, २६ जानेवारी १९३० रोजी काँग्रेसने इंग्रजांच्या गुलामगिरीविरुद्ध भारत पूर्णपणे स्वतंत्र घोषित केला होता. अशा स्थितीत संपूर्ण स्वराज प्रस्तावाच्या अंमलबजावणीच्या या तारखेचे महत्त्व लक्षात घेऊन राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी २६ जानेवारीची निवड करण्यात आली. १९५० मध्ये या दिवशी संविधान लागू झाल्यानंतर, देशाला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले आणि तेव्हापासून दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणून भारताच्या संविधानाची ओळख :

स्वातंत्र्याबरोबरच देशासाठी राज्यघटनेची गरजही भासू लागली. अशा परिस्थितीत ती निर्माण करण्यासाठी संविधान सभा स्थापन करण्यात आली. या सभेने ९ डिसेंबर १९४६ पासून संविधान बनवण्याचे काम सुरू केले. भारताच्या या संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते. तर संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यात डॉ. आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्यामुळे त्यांना राज्यघटनेचे निर्मातेही म्हटले जाते. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे, ज्याला बनवण्यासाठी तब्बल २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला. यानंतर, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे देशाचे संविधान सुपूर्द केले. त्यामुळे दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

 

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.  याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर, इ.स. १९२९ रोजी लाहो रजवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणाचे कार्यक्रम आयोजित केले जाते‌.

दरवर्षी आपण २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. याच दिवशी २६ जानेवारी १९५० रोजी संविधान देशात अंमलात आले होते. हा दिवस संपूर्ण राष्ट्रासाठी अभिमानाचा दिवस असतो. या दिवशी विविध ठिकाणी उत्सव साजरा केला जातो. शाळा, कॉलेज आणि इतर अनेक ठिकाणी ध्वजारोहण केले जाते.

बलसागर भारत होवो,
विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले,
जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले,
मी सिद्ध मरायाला हो
बलसागर भारत होवो…
प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा!

 

Happy Republic Day 2021 Messages in Marathi ...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *