डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मित विनम्र अभिवादन ..!!

Categories:

“देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला
माणसाला स्वाभिमान शिकवला
ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले
असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. ते प्रमुख कार्यकर्ता आणि समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं.

डाॅक्टर भिमराव आंबेडकरांची माहिती

डाॅक्टर भिमराव आंबेडकरांचा Dr.Br Ambedkar यांचा जन्म भारतातील मध्यप्रांतात झाला होता. बाबासाहेब 14 एप्रील 1891 ला मध्यप्रदेशातील इंदौर जवळ महु येथे रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई या दाम्पत्यांच्या पोटी जन्माला आले. जेव्हां आंबेडकरांचा जन्म झाला त्यांचे वडिल इंडियन आर्मीत सुभेदार होते आणि त्यांची नेमणुक इंदौर येथे होती.

3 वर्षानंतर 1894 ला त्यांचे वडिल रामजी मालोजी सकपाळ निवृत्त झाले आणि संपुर्ण कुटूंब महाराष्ट्रातील साता.यात स्थानांतरीत झाले. भिमराव आंबेडकर आपल्या आई वडिलांचे 14 वे आणि शेवटचे अपत्य होते. ते आपल्या कुटुंबांतील सर्वात छोटे सदस्य असल्याने सगळयांचे लाडके होते.

भिमराव आंबेडकर Dr.Br Ambedkar महाराष्ट्रातील मराठी परिवाराशी संबधीत होते आणि त्यांचे मुळगांव रत्नागिरी जिल्हयातील अंबवडे हे आहे, महार जातीतील असल्याने त्यांच्या सोबत सामाजिक आणि आर्थिक स्वरूपात मोठा भेदभाव केला जात असे.

इतकेच नाही तर दलित असल्याने उच्च शिक्षण घेण्याकरता देखील त्यांना फार संघर्ष करावा लागला तरीही त्यांनी सगळया कठीण परिस्थीतीवर मात करत उच्च शिक्षण प्राप्त केले आणि जगासमोर स्वतःला सिध्द करून दाखवले.

डॉ. भिमराव आंबेडकरांचे शिक्षण – B R Ambedkar Education

बाबासाहेबांचे वडिल आर्मीत असल्याने त्यांना आपल्या मुलांकरता शिक्षणात मिळणा.या विशेषाधिकाराचा फायदा झाला परंतु दलित असल्याने शाळेत देखील जातीगत भेदभावाला त्यांना सामोरे जावे लागले त्यांच्या जातीच्या विदयाथ्र्यांना वर्गात बसण्याची, शाळेतील पाणी पिण्याची परवानगी नव्हती. शाळेचा चपराशी त्यांना वरतुन हातावर पाणी टाकुन पिण्यास देत असे, जर चपराशी सुट्टीवर असला तर त्या दिवशी या मुलांना पाणी पिण्यास देखील मिळत नसे. या सर्व अन्यायांना सहन करत देखील बाबासाहेब उच्चविद्याविभुषीत झाले.

बाबासाहेबांनी आपले प्राथमिक शिक्षण दापोलीत घेतले त्यानंतर मुंबईत एलफ्निस्टन हायस्कुल ला प्रवेश घेतला अश्या पध्दतीने शिक्षण घेणारे ते पहिले दलित ठरले. 1907 ला त्यांनी मॅट्रिक ची डिग्री मिळवली.

या वेळी एक दिक्षांत समारोह देखील आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात भीमराव आंबेडकरांच्या प्रतिभेने प्रभावित होउन श्री कृष्णाजी अर्जुन केळुस्कर या शिक्षकांनी त्यांना स्वतः लिहीलेले ’बुध्द चरित्र’ हे पुस्तक भेट स्वरूपात दिले. पुढे बडौदा नरेश सयाजी राव गायकवाड यांची फेलोशिप मिळाल्याने बाबासाहेबांनी आपले पुढचे शिक्षण सुरू ठेवले.

बाबासाहेबांना लहानपणापासुनच अभ्यासाची रूची होती आणि ते एक हुशार आणि कुशाग्र बुध्दीचे विद्यार्थी होते म्हणुन ते आपल्या प्रत्येक परिक्षेत चांगल्या गुणांनी यशस्वी होत गेले. 1908 ला डाॅक्टर भिमराव आंबेडकरांनी Dr.Br Ambedkar एलफ्न्सिटन काॅलेज ला प्रवेश घेउन पुन्हा ईतिहास घडवला. उच्च शिक्षणाकरता काॅलेज ला प्रवेश घेणारे ते पहिले दलित होते.

त्यांनी 1912 ला मुंबई विश्वविद्यालयातुन पदवी परिक्षा उत्तिर्ण केली. संस्कृत शिकण्यास विरोध झाल्याने ते फारसी भाषेतुन उत्तीर्ण झाले. या महाविद्यालयातुन त्यांनी अर्थशास्त्र आणि राजनिती विज्ञान या विषयातुन पदवी प्राप्त केली.

फेलोशिप घेउन अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयात प्रवेश घेतला – Columbia University

भिमराव आंबेडकरांना बडौदा राज्य सरकारने आपल्या राज्यात रक्षामंत्री बनविले पण येथे देखील जातीभेदाने त्यांची पाठ सोडली नाही आणि त्यांना ब.याचदा अपमानाला सामोरे जावे लागले. त्यांनी बराच काळ या ठिकाणी काम केले नाही कारण त्यांना त्यांच्या अंगभुत प्रतिभेकरता बडौदा राज्य शिष्यवृत्तीने सन्मानित करण्यात आले होते, त्यामुळे त्यांना न्युयाॅर्क येथे कोलंबिया विश्वविद्यालयात उच्चपदवी प्राप्त करण्याची संधी मिळाली. आपल्या शिक्षणाला पुढे सुरू ठेवण्यासाठी 1913 ला ते अमेरिकेत निघुन गेले.

1915 साली आंबेडकरांनी B.R.Ambedkar अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयातुन समाजशास्त्र, इतिहास, दर्शनशास्त्र, मानव विज्ञान या सोबत अर्थशास्त्रातुन एम.ए ची मास्टर डिग्री प्राप्त केली. या नंतर त्यांनी ’प्राचीन भारताचे वाणिज्य’ यावर संशोधन केले. 1916 साली अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयातुन आंबेडकर यांनी पीएच.डी प्राप्त केली. त्यांच्या शोध प्रबंधाचा विषय होता ’ब्रिटिश भारतात प्रांतिय वित्त याचे विकेन्द्रीकरण’.

लंडन स्कुल ऑफ इकोनाॅमिक्स आणि पाॅलिटिकल सायन्स – University of London

फेलोशिप संपल्यानंतर त्यांना भारतात परतावे लागले. ब्रिटन मार्गे ते भारतात परत येत असता स्कुल आॅफ इकाॅनाॅमिक्स अॅण्ड पाॅलिटीकल सायन्स यात एम.एस.सी आणि डी.एस.सी व विधि संस्थानात बार.एट.लाॅ करीता त्यांनी आपले रजिस्ट्रेशन केले आणि मग भारतात परतले.

भारतात परतल्यानंतर त्यांनी प्रथम शिष्यवृत्ती च्या नियमानुसार बडौदा येथील राजांच्या दरबारात सैनिक अधिकारी आणि वित्तीय सल्लागाराची जवाबदारी स्विकारली. राज्याचे रक्षा सचिव या रूपात देखील त्यांनी काम केले.

हे काम करणे त्यांच्याकरता मुळीच सोपे नव्हते कारण जातिपातीच्या भेदभावामुळे त्यांना फार त्रास सहन करावा लागत होता इतकेच नव्हें तर संपुर्ण शहरात त्यांना भाडयाने घर देण्यास देखील कुणी तयार नव्हते.

या नंतर भिमराव आंबेडकरांनी (Dr.Br Ambedkar) सैन्य मंत्री ही नौकरी सोडली आणि एक खाजगी शिक्षक आणि अकाउंटंट म्हणुन त्यांनी नौकरी पत्करली. येथे ते सल्लागार व्यवसाय देखील करू लागले परंतु इथे देखील अस्पृश्यतेच्या मनोवृत्तीने त्यांचा पिच्छा पुरवला आणि सामाजिक स्थितीमुळे त्यांचा हा व्यवसाय देखील ठप्प पडला.

अखेरीस ते मुंबईला परतले येथे त्यांची मदत मुंबई गव्र्हनमेंट ने केली आणि ते मुंबईतील सिडेनहम काॅलेज आॅफ काॅमर्स अॅण्ड इकाॅनाॅमिक (Sydenham College of Commerce and Economic) ला राजनैतिक अर्थशास्त्राचे प्रोफेसर बनले. या दरम्यान त्यांनी आपल्या पुढच्या शिक्षणाकरता पैसे जमविले आणि शिक्षण सुरू ठेवण्याकरता 1920 ला पुन्हा एकदा ते भारता बाहेर इंग्लंड ला गेले.

1921 ला त्यांनी लंडन स्कुल आॅफ इकाॅनाॅमिक्स अॅण्ड पाॅलिटीकल सायन्स मधुन मास्टर डिग्री प्राप्त केली आणि दोन वर्षानंतर डी.एस.सी पदवी देखील मिळवली.

डॉ.भिमराव आंबेडकरांनी (BR Ambedkar) बाॅन, जर्मनी विश्वविद्यालयात देखील अध्ययनाकरता काही काळ घालवला. 1927 ला त्यांनी अर्थशास्त्रातुन डी.एस.सी केले. न्यायशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी ब्रिटिश बार मध्ये बॅरिस्टर म्हणुन काम केले. 8 जुन 1927 ला त्यांना कोलंबिया विश्वविद्यालयाव्दारे डाॅक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले.

डाॅक्टर भीमराव आंबेडकर यांचे राजनैतिक करियर – B.R.Ambedkar Political Career

डाॅक्टर भिमराव आंबेडकरांनी 1936 ला स्वतंत्र लेबर पार्टी बनवली पुढे 1937 ला केन्द्रिय विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पार्टी ने 15 सीटस् जिंकल्या त्याच वर्षी डॉ. आंबेडकरांनी आपले पुस्तक ’द एनीहिलेशन आॅफ कास्ट’ प्रकाशित केले, ज्यात त्यांनी हिंदू रूढिवादी नेत्यांची आणि देशात प्रचलीत जाती व्यवस्थेची कठोर निंदा केली.

त्यानंतर त्यांनी आणखीन एक पुस्तक प्रकाशित केले ‘Who were the Shudras?’ (शुद्र कोण होते?) ज्यात त्यांनी दलित वर्गाच्या एकसंघ असल्याची व्याख्या केली.

15 आॅगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्याबरोबर डॉ. आंबेडकरांनी आपल्या स्वतंत्र लेबर पार्टी ला अखिल भारतीय अनुसूचीत जाती संघ (आॅल इंडिया शेड्यूल) कास्ट पार्टीत परिवर्तीत केले. डॉ. आंबेडकरांची पार्टी 1946 ला झालेल्या भारताच्या संविधान सभेच्या निवडणुकीत चांगले प्रदर्शन करू शकली नाही.

पुढे काॅंग्रेस आणि महात्मा गांधींनी दलित वर्गाला हरिजन असे नाव दिले ज्यामुळे मागासलेल्या जाती हरिजन या नावाने देखील ओळखल्या जाऊ लागल्या. परंतु आपल्या निश्चयाविषयी दृढ असलेल्या आणि भारतीय समाजातुन अस्पृश्यतेला नेहमीकरता संपव.णाया डॉ. आंबेडकरांना गांधीजींनी दिलेले हरिजन हे नाव अजिबात आवडले नाही आणि या विषयाचा त्यांनी जोरदार विरोध केला.

त्यांचे म्हणणे होते की ’’अस्पृश्य समाजातील लोक देखील आपल्या समाजाचा एक भाग आहेत, आणि ते सुध्दा समाजातील अन्य सदस्यांसारखेच सामान्य माणसं आहेत.

पुढे डाॅक्टर भिमराव आंबेडकरांना व्हाॅइसराय एक्झीकेटीव्ह कौंसिल मधे श्रम मंत्री व रक्षा सल्लागार म्हणुन नियुक्त करण्यात आले. त्याग, संघर्ष, आणि समर्पणाच्या बळावर डॉ. आंबेडकर भारताचे पहिले कायदे मंत्री झाले. दलित असुन देखील डॉ. आंबेडकरांचे मंत्री होणे त्यांच्या जीवनातील मोठया यशापेक्षा कमी नव्हते.

भीमराव आंबेडकरांनी तयार केले भारतीय संविधान – Constitution of India

डाॅक्टर भिमराव आंबेडकरांचा संविधान निर्मीती मागचा मुख्य उद्देश देशातील जातिपातीचा भेदभाव आणि अस्पृश्यतेला मुळापासुन नष्ट करणे व अस्पृश्यता मुक्त समाजाची निर्मीती करून समाजात क्रांती आणणे हा होता सोबतच सर्वांना समानतेचा अधिकार देणे हा होता.

29 आॅगस्ट 1947 ला डॉ. भीमराव आंबेडकरांना संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणुन नियुक्त करण्यात आले. आंबेडकरांनी समाजातील सर्व वर्गांमधे समांतर पुलाच्या निर्माणावर भर दिला त्यांच्या मते देशातील वेगवेगळया वर्गांमधील अंतर कमी केले नाही तर देशाची एकता टिकवणे कठीण होईल. या व्यतिरीक्त त्यांनी धार्मिक, लिंग आणि जाती समानतेवर देखील विशेष भर दिला.

डॉ.भिमराव आंबेडकर शिक्षण, सरकारी नौक.या, नागरी सेवांमधे अनुसुचीत जाती आणि अनुसूचीत जनजातीतील लोकांकरता आरक्षण सुरू करण्यात विधानसभेचे समर्थन मिळवण्यात यशस्वी राहिले.

• Bharat संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना धर्माच्या स्वतंत्रतेचा अधिकार दिला.
• अस्पृश्यतेला मुळापासुन नष्ट केले.
• महिलांना अधिकार मिळवुन दिले.
• समाजातील वेगवेगळया वर्गांमधे पसरलेल्या अंतराला संपवल.

डॉ.भिमराव आंबेडकरांनी समता, समानता, बंधुता आणि मानवतेवर आधारित भारतीय संविधानाला जवळजवळ 2 वर्ष 11 महिने आणि 7 दिवसांच्या अथक परिश्रमाने 26 नोव्हेंबर 1949 ला तयार करून तेव्हांचे राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द करीत देशातील सर्व नागरिकांना राष्ट्रीय एकता, अखंडता आणि व्यक्तीची स्वाभिमानी जीवन पध्दती ने भारतीय संस्कृतीला गौरवान्वित केले.

संविधानाच्या निर्मीतीतील आपल्या भुमिके व्यतिरीक्त त्यांनी भारताच्या वित्त आयोगाच्या स्थापनेत देखील मदत केली, आपल्या नितीमुल्यांच्या माध्यमातुन देशाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत बदलाव करून प्रगती केली शिवाय त्यांनी स्थिर अर्थव्यवस्थेबरोबरच मुक्त अर्थव्यवस्थेवर देखील जोर दिला.

डॉ.बाबासाहेबांनी निरंतर महिलांच्या स्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. 1951 मधे महिला सशक्तीकरणाचे हिंदू संहिता विधेयक पारीत करण्याचा देखील प्रयत्न केला, याच्या मंजुर न होण्याने त्यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर भीमराव आंबेडकरांनी लोकसभेकरता निवडणुक देखील लढली परंतु यात त्यांना अपयश आले पुढे त्यांना राज्यसभेत नियुक्त करण्यात आले, आपल्या मृत्युपर्यंत ते याचे सदस1955 साली त्यांनी आपला ग्रंथ अनेक राज्यांतील भाषांचा विचार करून प्रकाशीत केला. आन्ध्रप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र व प्रबंधन योग्या राज्यांमधे पुर्नगठीत करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, पुढे 45 वर्षांनंतर काही प्रदेशांमधे ते साकार झाले.

डॉ.आंबेडकरांनी निर्वाचन आयोग, योजना आयोग, वित्त आयोग, महिला आणि पुरूषांकरता समान नागरी हिंदु संहिता, राज्य पुर्नगठन, मोठया आकाराच्या राज्यांना लहान आकारात संघटीत करणे, राज्याचे निती निर्देश तत्व, मौलिक अधिकार, मानवाधिकार, नियंत्रक आणि महालेखापरिक्षक, निर्वाचन आयुक्त आणि राजनैतिक सरंचना मजबुत करणारी सशक्त, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व विदेशी धोरणं देखील तयार केलीत.

इतकेच नव्हें तर डॉ.आंबेडकर आपल्या जिवनात सतत प्रयत्न करत राहिले व त्यांनी आपल्या कठिण संघर्षाने व प्रयत्नांच्या माध्यमातुन लोकशाही मजबुत करणे, राज्यातील तिन अंगांना (स्वंतत्र न्यायपालिका, कार्यकारी, विधानमंडळ) यांना वेगवेगळं केलं सोबतच समान नागरिक अधिकारा अनुरूप एक व्यक्ति एक मत व एक मुल्य या तत्वाला प्रस्थापीत केले.

विलक्षण प्रतिभेचे धनी डॉ.आंबेडकरांनी न्यायपालिकेत, कार्यकारी व कार्यपालिकेत अनुसुचित जाती आणि जनजातीच्या लोकांचा सहभाग संविधानव्दारे सुनिश्चित केला आणि भविष्यात कोणत्याही प्रकारच्या निवडीत जसे ग्राम पंचायत, जिल्हा पंचायत, पंचायत राज यात सहभागाचा मार्ग प्रशस्त केला.

सहकारी आणि सामुहीक शेती सोबत उपलब्ध जमिनीचे राष्ट्रीयीकरण करून जमिनीवर राज्याचे स्वामित्व स्थापीत करणे व सार्वजनिक प्राथमिक व्यवसाय, बॅकिंग, विमा या उपक्रमांना राज्याच्या नियंत्रणाखाली ठेवण्याकरता जोरदार समर्थन दिले शिवाय शेतक.यांच्या लहान पिकांवर अवलंबुन बेरोजगार मजुरांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हाव्यात याकरता त्यांनी औद्योगिकरणाकरता सुध्दा बरेच कार्य केले.

डाॅ. भिमराव आंबेडकरांचे वैय्यक्तिक जिवन – B R Ambedkar Short Biography

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला विवाह 1906 साली रमाबाई यांच्यासोबत झाला त्यांना एक मुलगा झाला ज्याचे नाव यशवंत असे होते.

1935 साली रमाबाईंचे दिर्घ आजाराने निधन झाले.

1940 साली भारतीय संविधानाचा मसुदा पुर्ण केल्यानंतर डॉ. आंबेडकरांना देखील अनेक आजारांनी ग्रासले होते ज्यामुळे त्यांना रात्री झोप येत नसे, नेहमी पाय दुखायचे, मधुमेहाची समस्या फार वाढल्याने त्यांना इन्सुलिन घ्यावे लागायचे.

उपचारांकरता ते मुंबईला गेले तेव्हां पहिल्यांदा त्यांची भेट एक ब्राम्हण समाजाच्या डाॅक्टर शारदा कबीर यांच्याशी झाली. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला व 1948 ला दोघेही विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर डॉ. शारदा यांनी आपले नाव बदलुन सविता आंबेडकर असे ठेवले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *