आपणा सर्वाना होळी निमित्त हार्दिक शुभेच्छा!
होळी च्या दिवशी संध्याकाळी लाकडांची मोळी रचून ती पेटवली जाते त्यास होलिका दहन असे म्हणतात. यामागे मोठी आख्यायिका आहे. भक्त प्रल्हाद हा विष्णूचा मोठा भक्त होता आणि भक्त प्रल्हादाचे वडील हिरण्यकशिपू यांना आपल्या मुलाने विष्णूची भक्ती केलेली आवडत नसे म्हणून आपल्या मुलाचा वध करण्यासाठी हिरण्यकशिपूने आपली बहीण होलिका हिला प्रह्लाद ला मारण्याची कामगिरी सोपवली. होलिका ला आगीत न जळण्याचा वर होता. म्हणून ती प्रल्हादाला घेऊन आगीमध्ये उतरली पण भक्त प्रलहादच्या अफाट शक्तीमुळे होलिकाच शेवटी आगीत भसम झाली आणि प्रल्हाद सुखरूप बाहेर आले. म्हणून तेव्हापासून होलिका दहन केले जाते.
होळी सण हा दिल्ली, आग्रा आणि जयपूर या राज्यात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. उत्तर भारतीय या सणाला खूप मानतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन म्हणजेच रंगांचा उत्सव साजरा केला जातो. यादिवशी एकमेकांना रंग लावून होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या जातात.