भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे,
समानता आणि सत्यासाठी देह झिजणारे,
बहुजनांचे उध्दारक,सत्यशोधक समाजाचे
संस्थापक व थोर विचारवंत…
क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले
यांच्या जयंतीनिमित्त त्यांना
विनम्र अभिवादन!!!
खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले ,
भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य,
भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
सामाजिक समतेचा संदेश देणारे आणि
शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खरा खुरा स्वतंत्र मिळवून देणारे
शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या
महात्म्यास आपणा सर्वांतर्फे शत शत वंदन.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
थोडक्यात माहिती
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली पुण्यात झाला. त्यानंतर त्यांची वयाच्या १३ व्या वर्षी १८४०साली सावित्रीबाईंसोबत लग्नगाठ बांधली गेली. ज्योतिबा अत्यंत बुद्धीमान होते. त्यावेळेस महाराष्ट्रात धार्मिक सुधारणेची चळवळ जोर धरत होती. जातिव्यवस्थेला विरोध करण्यासाठी आणि एकेश्वरवादाची अंमलबजावणी करण्यासाठी ‘प्रार्थना समाज’ स्थापन करण्यात आला, ज्याचे प्रमुख होते गोविंद रानडे आणि रा.ग. भांडारकर.
स्त्री शिक्षणाबाबतही महाराष्ट्रात काहीशी उदासिनता पाहायला मिळत होती. मात्र महात्मा फुले यांनी एका स्त्रीचं शिक्षण म्हणजे अवघ्या कुटुंबाचं शिक्षण हे आधीच जाणलं होतं. त्यामुळे महात्मा फुले यांनी आधी सावित्रीबाई यांना शिक्षणाचे धडे दिले आणि मग स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
पुण्यातल्या भिडेवाडा इथे स्त्रियांचे वर्ग भरवण्यात येऊ लागले. मात्र लोकांनी या जोडप्याला दगड, शेण यांचा मारा करत थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीही केल्या शिक्षण मुलींपर्यंत पोहोचवायचं असा ध्यास घेतलेल्या या जोडप्याने मागे वळून पाहिलं नाही आणि स्त्री शिक्षणाचं महत्व महाराष्ट्राला समजलं.
सत्यशोधक समाजाची स्थापना हे ज्योतिबा फुले यांच्या दूरदर्शी व्यक्तीमत्वाचा आणखी एक पैलू. समाजात पसरलेल्या जातीभेदाला दूर करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती.
शेतकऱ्यांचा आसूड’ हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. १८८८ साली सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी “महात्मा” ही पदवी प्रदान केली होती.